- ‘तु कॉल गर्ल आहेस’ सोशल मिडियावरद्वारे पोस्ट व्हायरल करीत बदनामी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२३) :- एकाच कंपनीमध्ये फिर्यादी महिला व आरोपी हे दोघे कामाला होते. दरम्यान आरोपीने फिर्यादी महिलेला विवाहाचे आमिष दाखवले. त्यांच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादीचा विश्वास संपादन करुन त्यांच्या क्रेडीट कार्डवरुन ६०,००० रुपये खर्च केले. फिर्यादीला हाताने मारहाण करुन त्यांचा गळा दाबुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या उजव्या हाताला चावा घेवुन दुखापत पोहचवली. तसेच आरोपीचा भाऊ याने स्वतःच्या फेसबुक व इंस्टाग्राम वर पोस्ट करुन ‘तु कॉल गर्ल आहेस’ असे म्हणत फिर्यादीच्या मन्नास लज्जा निर्माण केली.
फिर्यादीची बदनामी करुन फिर्यादीस तुझे आई वडील यांना घरात घुसुन मारुन टाकीन अशी धमकी दिली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यापासून ते दि १९/०२/२०२३ पर्यंत घडला.
महिला फिर्यादीने आरोपी मुनिष शर्मा, शुभम शर्मा यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीसांनी आरोपी विरोधात १८०/२०२३ भा.द.वि. कलम ३७६ (२) (एन), ३०८, ५०६, ५०९,४०६, ३२५,३२३, ३४ माहिती तंत्रज्ञान आघि ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.















