न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२३) :- एचडीएफसी बँक खात्याची केवायसी पेडींग असल्याबाबतचा खोटा संदेश मोबाईल क्रमांक वापरकर्त्या इसमाने फिर्यादीच्या मोबाइलवर पाठवला. त्यामधील फसव्या लिंकद्वारे एचडीएफसी बँकेसारखे बनावट पेज ओपन झाले. त्यामध्ये फिर्यादीने भरलेला बँक खात्याचा तपशिल आरोपीने फसवणूकीने प्राप्त केला. फिर्यादीच्या बँक खात्यातून एकूण १,९९,७७८ रुपये प्राप्त करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
ही घटना (दि. २) रोजी दुपारी १.१३ च्या सुमारास संगणकिय साधनाद्वारे फिर्यादीच्या घरी घडली. फिर्यादी युसुफ जब्बार शेख (वय ३७ वर्ष, रा. सर्वे क्र ५०९, बिलाल मस्जिद शेजारी, रेल्वेगेट, कासारवाडी) यांनी आरोपी मोबाईल क्रमांक वापरकर्ता इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी १९९/२०२३, कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१ भा.दं.वि. सह कलम ६६ (सी), ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनीयम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















