न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२३) :- परफेक्ट लॅबोरेटरी सर्व्हिसेस कंपनीच्या नावावरील ओडाफोन-आयडीया कंपनीचा मोबाईल (९८८१७२३९८२) एक्टीव्हेट करण्यासंदर्भात कंपनीच्या नावाने आयडीया-ओडाफोन कंपनीला मेल पाठवला. सिमकार्ड डीएक्टीवेट करुन मोबाईलला कनेक्ट असलेल्या परफेक्ट लॅबोरेटरी सर्व्हिसेस कंपनीच्या कॅनरा बँकेच्या अकाऊंट नंबरवरून सुरुवातीला ९,००,००० रूपये, त्यानंतर १२,००,००० रूपये असे एकुण २१,००,००० रूपये आरोपीने ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेत आर्थिक फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. २५/०९/२०२२ रोजी रात्री ७.५३ ते दि. २६/०९/२०२२ रोजी सकाळी ८.२६) दरम्यान परफेक्ट लॅबोरेटरी सर्व्हिसेस कंपनी, डी-१ ब्लॉक, एमआयडीसी चिंचवड येथे घडला.
फिर्यादी आनंद दिगंबर शुक्रे (वय ४२ वर्ष, धंदा-नोकरी, रा. फ्लॅट नं. ए ७०१, वन नेशन सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी आयसीआयसीआय बँकचे अकाऊंट नावावर असलेला मंताजुल इस्लाम मुल्ला (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी २६५ / २०२३भा.द.वि कलम ४२० माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे.















