न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२३) :- पिस्तुल जवळ बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना आरोपीने अवैधरित्या देशी बनावटीचे २ पिस्तुल व ३ जिवंत काडतुसं स्वतःजवळ बाळगले. याची वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी (दि. ३) रोजी सायंकाळी ५:५० च्या सुमारास सावित्रीबाई फुले गार्डन, मॅजेस्टीक हॉटेल जवळ, जगताप डेअरी वाकड येथून आरोपीला ताब्यात घेतले.
करण गजानन चोपवाड (वय २३ वर्षे रा. शिवराजनगर कॉलनी नं.०२, भारत गॅसचे पुढे रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वाकड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २२१/२०२३ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३.२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून एकुण ५३,१०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.