- सिक्युरीटी गार्डसह माथाडी कामगारांवर कोयता उगारला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२३) :- तोंडाला मास्क लावून आरोपींनी गेटद्वारे बेकायदेशीरपणे मॉलमध्ये प्रवेश केला. त्यापैकी काळ्या रंगाची टोपी परीधान केलेल्या इसमाने हातातील कोयता लाकडी टेबलवर मारला. दगडाने गार्ड केबीनची काच फोडुन सिक्युरीटी गार्डला हाताने मारहाण केली. तसेच त्यांचे पैकी पांढरा फुल बाह्याचा शर्ट परीधान केलेल्या इसमाने फिर्यादीला हाताने मारहाण करून त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून माथाडी कामगारांना जिवे ठार मारण्याची धमकी देत दगडाने जेसीबीची काच फोडुन नुकसान केले. तसेच संगणमताने त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादीचे सहकारी अनिल कांबळे व प्रविण पारखी यांच्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. अनिल कांबळेच्या खिशातील १०,००० रुपये जबरदस्तीने काढुन घेवुन गेट क्रमांक ६ मधुन दहशत करीत निघुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि ३) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास फिनिक्स मॉल, ६ नंबर गेट, वाकड येथे घडली. फिर्यादी लोकेश विनोद लखन (वय २७ वर्षे, धंदा- माथाडी कामगार, रा. रुम नं. २०. सुरती मोहल्ला, खडकी) यांनी आरोपी ६ ते ७ अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात २२३/२०२३. भा.द.वि. कलम ३९५.३९७, ४४७, ४२७,५०६, ३४, सह लॉक्रिमिनल अॅमेंडमेंट अॅक्ट ३, ७ सह आर्म अॅक्ट ४ (२५) सह मपोकाकलम ३७ (१) (३)/ १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.