न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नेहरूनगर येथील क प्रभागातील व्यायामशाळेचे जुने व नादुरुस्त व्यायामचे साहित्य २०१६ मध्ये आण्णासाहेब मगर स्टेडीअम येथील बंद मुलांचे हॉस्टलमधील रुममध्ये डंप करुन ठेवले होते.
अज्ञात चोरट्याने हॉस्टेलच्या गेटचे कुलुप व कॉलप्स गेट तोडुन आत प्रवेश केला. जिन्यावाटे रुममध्ये प्रवेश करुन ५८,७४० रूपये किंमतीचे जिमचे वेगवेगळे प्रकारचे सामान चोरी केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी संदिप सदाशिव विनोद (वय ५० वर्षे, धंदा. नोकरी, रा. फ्लॅट नं ४, नं ६१. मासुळकर कॉलनी, अजमेरा, पिंपरी यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २९५/२०२३, भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.