न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२३) :- अल्पवयीन मुलाकडून जबरदस्तीने चोरी केलेला मोबाईल पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेने हस्तगत केला असून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, मोबाईल चोरी, घरफोडीच्या गुन्हयास प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी खंडणी विरोधी पथकाकडील उघडकीस न आलला मोबाईल स्नॅचिंग, जबरी चोरी गुन्हयांचा समांतर तपासाचे पोलिसांना आदेश दिले होते. पोहवा सुनिल कानगुडे यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून, वृंदावन हॉटेलजवळ, येवले अमृततुल्य समोर, जाधववाडी या ठिकाणी सापळा लावुन, अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये १०,००० रुपयांचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला. त्याबाबत विचारपुस केली असता, त्याने त्याचा मित्र रोहन व त्यासोबत असलेल्या इसमासह रावेत येथे फोनवर बोलत पायी जाणाऱ्या महिलेचा मोबाईल हिस्कावुन नेल्याचे सांगितले. रावेत पोलीस ठाणे येथे खात्री करता सदर मोबाईल चोरबाबत रावेत पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १३२ / २०२३ भादवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने सदरचा मोबाईल जप्त करुन, अल्पवयीन मुलास पुढील कारवाईसाठी रावेत पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास रावेत पोलीस स्टेशन करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली आहे.