न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृध्दींगत करण्यासाठी शहरामध्ये ७ ते ३० मार्च या कालावधीत स्वच्छोत्सव-२०२३ अभियान साजरा करण्यात येत आहे. शहरामध्ये Women Icons Leading Swachhata (WINS) Award, स्वच्छता जागृती फेरी व स्वच्छता शपथ आणि जागतिक शुन्य कचरा अशा विविध उपक्रमाद्वारे स्वच्छोत्सव २०२३ अभियान साजरे करण्यात येणार आहे.
Women Icons Leading Swachhata (WINS) Award मध्ये शहरातील महिला बचत गट, मायक्रो एन्टरप्रायजेस, नवोदित उदयोजीका, स्वयंसेवी संस्था, वुमन एन्टरप्रेनीयर्स व चेंज एजन्टस इ. या श्रेणीत स्वच्छतेविषयक कामकाज करणा-या महिला अथवा महिला समुदाय सहभागी होवु शकतात. याकरीता सहभागी महिला अथवा महिला समुदाय यांनी स्वच्छता विषयक कामकाज, समुदाय यांनी सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाचे व्यवस्थापन, सेप्टीक टँक स्वच्छता विषयक कामकाज, मल नि:सारण प्रक्रिया कामकाज, महानगरपालिका कचरा संकलन व वाहतुक, एमआरएफ सेंटर, वेस्ट टु वेल्थ प्रोडक्ट, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया, क्षमता बांधणी, जनजागृती, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन, स्वच्छता विषयाशी संबंधित इतर क्षेत्रातील कामकाज या कार्यक्षेत्रामध्ये काम केलेले असावे.
स्पर्धेच्या प्रवेशिका महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सहभागी स्पर्धकांनी sbm2020@pcmcindia. gov.in या ई-मेल अथवा जवळच्या क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाकडे प्रवेशिका सादर कराव्यात. या स्पर्धेमध्ये प्रवेशिका भरण्याची मुदत दिनांक ५ एप्रिल २०२३ पर्यंत अशी राहील. वरील कार्यक्षेत्रातील Innovativeness, impact, uniqueness, sustainability & reliability या तत्वांच्या आधारे छाननी करुन महिला बचत गट, मायक्रो एन्टरप्रायजेस, नवोदित उदयोजीका, स्वयंसेवी संस्था या श्रेणीतून १ सर्वोत्तम प्रवेशिकेचे नामनिर्देशन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.
Women Icons Leading Swachhata (WINS) Award मध्ये शहरातील जास्तीत जास्त महिला, बचत गट, मायक्रो एन्टरप्रायजेस, नवोदित उदयोजीका, स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग नोंदवुन स्वच्छोत्सव २०२३ अभियान यशस्वी पुर्ण करण्यासाठी महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.