- तब्बल सतरा लाखांची तंबाखुजन्य पदार्थांची २८ पोती जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गुटख्याची वाहतुक करणाऱ्या ३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडुन १७,१२,०२८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही धाडसी कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दरोडा विरोधी पथकाने चिखलीत केली.
अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते. या अनुषंगाने (दि. १५) रोजी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, अधिकारी व पोलीस अंमलदार हे रात्रगस्त करीत होते. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे व स्टाफ परिसरात भंगारची दुकाने चेक करीत होते. दरम्यान अॅक्सेस मोपेड व टेम्पोमधील आरोपी पोलिसांना पाहुन पळुन जावु लागले. त्यांना पोलिसांनी काही अंतरावर जावुन गाठले.
आरोपी शाकिर शब्बीर अन्सारी (वय-२३ वर्षे, रा. लोहीया नगर, एफ पी ५४, गंजपेठ, पुणे), चाँद गुलाम शेख (वय ४२ वर्षे, रा-१०५३, भवानी पेठ, एडी कॅम्प चौक, पुणे) तसेच अॅक्सेस मोपेडवरील नफिज शरिफ अहमद अन्सारी (वय ३४ वर्षे, रा. शिवनेरीनगर, मरियन कम्प्लेक्स, फ्लॅट नंबर-२०३, आयडीयल बेकरी जवळ कोंढवा), यांना पोलिसांनी शिताफिने पकडले.
वाहनांची तपासणी केली असता, टेम्पोमध्ये (एमएच१२एसएक्स०८५३) यामध्ये ९.६८,५२८ रकमेचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थांची एकुण २८ पोती मिळुन आली. तसेच अॅक्सेस मोपेड (एमएच१४जीटी०५०४) यामध्ये ४,४३,५०० रोख रक्कम मिळुन आली. तसेच गुन्ह्यात वापरलेला २,५०,००० रकमेचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो, ५०,००० ची मारुती सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेड असा एकुण मिळुन १७,१२,०२८ रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. आरोपीं विरोधात चिखली पोलीस ठाणे गुरनं १६८ / २०२३ भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३,१८८ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम ३० (२) (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, पोलीस सह आयुक्त मनोज लोहीया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पद्माकर घनवट यांचं मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहा पोलीस निरीक्षक अंबरीष देशमुख, चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे, सपोनि नकुल न्यामणे, तसेच पोलीस अंमलदार राहुल खारगे, प्रविण माने, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, प्रशांत सैद, औदुंबर रोंगे तसेच चिखली पोलीस ठाणेकडील किसन वडेकर, शिंदे व घनवट यांच्या पथकाने केली आहे.