न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खडकी (दि. १७ मार्च २०२३) :- खडकी कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील ५७ बोर्डांच्या निवडणूका संरक्षण मंत्रालयाने आज रद्द केल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या राजपत्रानुसार आजपासून १७ मार्च पासून निवडणूकविषयीचे सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या कार्यालयात विशेष राजपत्रविषयीची सूचना लावण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा २००६ च्या अधिनियम ४१ च्या आधारे ही ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. त्याबाबत १८ फेब्रुवारीला राजपत्राद्वारे सूचना देण्यात आली होती.
देशातील ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डात सध्या प्रशासक कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२१ बोर्डाच्या सदस्यांचे सभासदत्व संपले असून बोर्डातील कारभार त्रिसदस्यीय समिती पाहत आहे. आतापर्यंत दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली होती. आता अचानक निवडणूक रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.