न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश गायवळ व इतर दोघांचे अनधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोड लगत निलेश गायवळ याचे तसेच इतर दोघांच्या वाढदिवसानिमीत्त अनधिकृत फ्लेक्स लावल्याने हिंजवडी पोलीस स्टेशन व पुणे महानगरपालिका, बावधन क्षेत्रीय कार्यालय यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून अनधिकृत फ्लेक्स काढून टाकले आहेत.
निलेशभाऊ गायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व इतर दोघांवर अनधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी निलेश काळुराम घोलप, परवाना निरीक्षक, कोथरूड, बावधन क्षेत्रिय कार्यालय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहीता कलम १८८ व महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरणास प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.