न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- चुलत बहिणीच्या आरोपी नवऱ्याने फिर्यादी महिला व तिच्या चुलतीला जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीसोबत वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध स्थापित करुन तिला गर्भवती केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२३) जितेंद्र बेरनार यांचा फ्लॅट नं ३०४, हेजल सोसायटी, साखरेवस्ती रोड, नारायननगर, हिंजवडी यथे घडला.
महिला फिर्यादीनी आरोपी रुपेश अशोक लिडेकर (वय ४५ वर्षे, रा. विनोदे वस्ती, वाकड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २५२/२०२३ भा.दं.वि. कलम ३७६ (२) (एन), ५०६ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















