न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- प्रोराईटस इंक्युपमेन्टस प्रा. लिमीटेड, शेलारवस्ती, चिखली या कंपनीच्या शेडमधुन ३,००,००० किंमतीचे एस. एस. ३०४ आणि ३१६ असे वेगवेगळ्या आकाराचे पाईप, लहान मोठे प्लॅन्जेस एलबो, रेड्युसर हे सामान अज्ञात चोरटयाने (दि. १६) रोजी रात्री ००.३० च्या सुमारास चोरून नेले आहे.
फिर्यादी चंद्रकांत पांडुरंग निकम (वय ५३ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. च-होली बुद्रुक) यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपी विरोधात १७१ / २०२३ भा.द.वि.क.- ४६१,३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















