न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२३) :- सोमाटणे येथे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने (२३ बीएच ५५६० ए) महामार्गावर आज शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरक्षा कठड्याला धडक दिली.
रस्त्याच्या कडेला असणारा सुरक्षा दुभाजकाचा पत्रा कारमध्ये आरपार घुसला. विचित्र अपघातात जीवितहानी झाली नाही. एक जण जखमी झाला आहे. तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत.
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली. कालच येथील शिरगावमध्ये कारने समोरील ट्रकला धडक देऊन तिघांचा बळी घेतला होता. त्यामुळे वाहनचालकांनो महामार्गावर वाहने जपून चालवा व अपघात टाळा.