न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२३) :- प्लॉटींगचा फिर्यादीचा व्यवसाय आहे. ” तु प्लॉटींग व्यवसायामध्ये भरपुर पैसा कमवला आहे. माझ्यावर मर्डर व रेपची केस असुन, पिंपरी चिंचवडचा भाई आहे. तुला जर प्लॉटींग धंदा करायचा असल्यास, मला दर महीना १०,००० रुपये हप्ता दयावा लागेल. पैसे न दिल्यास तुला त्रास होईल ” अशी आरोपीने फिर्यादीला धमकी दिली.
गुगल पे द्वारे आरोपीने फिर्यादीकडुन ३८,००० रुपये रक्कम घेतली. फिर्यादीच्या ऑफीसमध्ये येऊन, ” तु प्लॉटींगचे बरेच व्यवहार केल्याने, मला ५०,००० रुपये रक्कम दे ” अशी पुन्हा मागणी करीत फिर्यादीच्या टेबलच्या ड्राव्हरमध्ये हात घालुन त्यामध्ये ठवेलेले ४०,००० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने आरोपीने काढुन घेतली. ” पोलीसांकडे तक्रार केल्यास, तुला खलास करुन टाकु ” अशी धमकी देत एकुण ७८,००० रुपये रक्कम हप्ता म्हणून आरोपीने फिर्यादीकडून खंडणी स्वरुपात घेतली आहे. तसेच ” आणखी २ लाख रुपये रक्कम खंडणी मागुन, पैसे न दिल्यास, फिर्यादी व फिर्यादीच्या मुलाचा मर्डर करुन टाकीन ” अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार जानेवारी २०२२ ते १२/०३/२०२३ दरम्यान दुपारी २:५४ च्या दरम्यान वेळोवेळी “ओम लॅन्ड डेव्हलपर्स ” गाथा मंदीर बायपास रोड, तळवडे येथील फिर्यादीचे ऑफीस व राहत्या घरी घडला.
फिर्यादी संदीप उर्फ संजय आनंदा काळोखे (वय ४० वर्षे, धंदा प्लॉटींग, व्यवसाय रा. तळवडे) यांनी आरोपी सुधीर सोपान जाधव (रा. पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी आरोपीविरोधात १९३/२०२३ भा.दं.वि. कलम ३८६,३८७, ३९२, ४४८ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.