- गोहत्या करणाऱ्यांवर मोका ही राज्यातील पहिलीच कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२३) :- गाईंना इंजेक्शन देऊन त्यांना बेशुध्द करुन त्यांची कत्तल करणारी संघटीत गुन्हेगारी टोळी जेरबंद करून त्यांच्यावर मोका कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे. गोहत्या करणाऱ्यांवर अशा प्रकारे मोकाची कारवाई होणं ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामिण व रायगड पोलीस अधिक्षक यांच्या कार्यक्षेत्रात रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी व माळराणावर चोरुन घेवून जाऊन गाईंना गुंगीकारक इंजेक्शन देऊन त्यांना बेशुध्द केले जात होते. त्यांची कत्तल करुन मांस घेवून जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. आरोपी २ ते ३ तासामध्ये हा सर्व प्रकार करून फरार होत असत. अशा टोळीतील ९ आरोपींना दिघी पोलिसांच्या तपास पथकाकडून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण २५,२०,९८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकूण १४ गुन्हे उघड केले आहेत.
दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. ४८४ / २०२२ भा.द.वि. कलम ३८०, ४२९, ३४ सह प्राणी संरक्षण अधि. सुधारणा सन २०१६ चे कलम ५.५ (अ). ५ ( ब ) ६.९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (अ) १३५ मधील पाहिजे आरोपी यांचा दिघी पोलीस ठाण्याचे पोउनि भदाणे व त्यांच्या पथकाने सतत दोन महीने मुंबई, ठाणे, पुणे येथे सापळा रचुन तसेच तांत्रिक विश्लेषन व कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी मोशीन बाबू कुरेशी, शाहिद रहेमान कुरेशी, मोह अब्दुल रहमान कुरेशी, आशराफ सलमान कुरेशी, मोह, आरिफ सलमान कुरेशी, सोहेल फारुक कुरेशी, राहुल पंडीत उर्फ राहुल मैया उर्फ राहील महंमद कुरेशी, मोशीन शरिफ कुरेशी, जाफर सुजीतकुमार सुभाषचंद्र पानीगृही अशा एकूण ९ आरोपींना ताब्यात घेतले आले. आरोपीकडून तीन वाहने (एन्जॉय, इनोव्हा, ऍक्सिव्ही महिंद्रा) तसेच गुन्हयात वापरलेले कोयते, सत्तुर, नायलॉन च्या दोऱ्या, इंजेक्शन औषधाची बाटली, नंबर प्लेट असा एकूण २५,२०,९८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून १४ गुन्हे उघड करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आरोपी यांचा खुनाचा प्रयत्न, दंगल तसेच गाईच्या चोरी तस्करी अशा इतर प्रकारचे २९ गुन्हयात सहभाग असल्याचे निदर्शनात आले आहे. त्याअनुषंगाने गुन्हयाचा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त मनोज लोहिया. अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, दिघी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनील भदाने, पोहवा ७३१/ फलके, पोहवा ८०१/ पोटे, पोहवा १०२० कांबळे, पोहवा ११६८ जाधव, पोना १५७१ विधाते, पोना १५७२ जाधव, पोना १६६५ नवगिरे, पोशि २०१२ दहिफळे, पोशि २०९४ जाधव, पोशि २५५८ शिंदे तसेच मपोना १६२० भाग्यश्री जमदाडे यांनी केली आहे.
















