न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- रिक्षा चालकाने रिक्षामध्ये (एमएच१४जेपी१४०८) मैत्रीणी सोबत अश्लिल चाळे करताना आरोपीला हटकले. आरोपीला त्याचा राग आला. त्यावरून आरोपीने फिर्यादीला ‘ तेरा गेम ही बजा डालता हूँ अभी ‘ असे धमकावले. रस्त्यावरील विट-सिमेंटचे तुकडे रिक्षा चालकाच्या डोक्यात, छातीत, पोटावर जोरजोरात मारून त्यांना गंभीर जखमी करून ठार मारले. परिसरात दहशत निर्माण केली.
फिर्यादीचा भाऊ मयत रिक्षाचालक अलीम उर्फ अली इस्माईल शेख (वय ४२ वर्षे, रा. श्रीकृष्ण मंदीरामागे, जवळकरनगनर, पिंपळे गुरव) असे मयताचे नाव आहे. ही घटना (दि. १९) रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास गणपती मंदीर, गणेश गार्डन फेज-३, दापोडी येथे घडली.
फिर्यादीचा भाऊ असिफ इस्माईल शेख (वय ४६ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. अवसा हाईट, बी बिल्डींग, फ्लॅट नं. १७, चांदतार मस्जित जवळ, नानापेठ, पुणे) यांनी आरोपी अमित बाळासाहेब कांबळे (वय २६ वर्षे, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी २३६/२०२३.भा.दं.वि. कलम ३०२,३२३,३२४, ५०४, ५०६ (२), क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ३.७ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.
















