- गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई; गंभीर स्वरुपाचे ७ गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- पिस्टल व गांजासह सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. पाहिजे, फरारी व तडीपार आरोपी तसेच अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार (दि. १८) रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्यासह सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे स्टाफसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हदीतील हिजवडी, मारुंजी, कासारसाई भागात पेट्रोलिंग करीत होते. पुसाणे येथे आले असता सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे यांना बातमीदारामार्फत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुर घोलप हा त्याच्या साथीदारासह दुचाकीवरुन पुसाणे गावाकडे येत असून, त्याच्याकडे पिस्टल व गांजा आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
सपोनि उध्दव खाडे यांनी सोबत असलेल्या स्टाफला बीफ करुन पुसाणेतील सितमाला बंगल्यासमोरील रोडवर सापळा लावला. दुचाकी मोपेडवरुन आलेला मयुर अनिल घोलप (वय २९ वर्षे रा. लक्ष्मीगंगा अर्पाटमेंट, फ्लॅट नं. १९, पागेची तालीम, चिंचवडगाव; सध्या रा. पुसाणे, ता. मावळ, जि. पुणे) व शंभू संजय गंगावणे (वय २१ वर्षे, रा. धोंडेवाडी, पाचवड फाटा, कराड जिल्हा सातारा) यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली.
आरोपी मयुर घोलप याच्याकडे ४०,००० किंमतीचे एक पिस्टल, ६५,००० किंमतीची दुचाकी मोपेड गाडी, तसेच आरोपी शभु गंगावणे याच्या ताब्यात ३१,००० रुपये किंमतीचा १२४० ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ असा एकुण १,३६,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुध्द शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे गुरनं. ८२/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ व एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मयुर घोलप हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याच्या विरुध्द दरोडा, खुन करण्यासाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न, सदोष मुनष्य वधाचा प्रयत्न व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे ७ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, डॉ.संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पो.उप निरी. अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, किरण काटकर, रमेश गायकवाड, निशांत काळे, रमेश मावसकर, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली आहे.