न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- घरातील लोकांसोबत फिर्यादी हे जेवण करून पायी फिरत असताना जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी त्यांच्या समोर आला. ‘ तु मेरे साथ इज्जत से रेहना, तु आज कल बहुत उड़ रहा है ‘ असे फिर्यादीला म्हणाला. फिर्यादी हे त्याला ” मैने क्या किया है ” असे म्हणाले असता आरोपीने त्याच्याजवळ असलेला कोयते काढला. फिर्यादीच्या डाव्या गालावर कोयता मारला. त्यामधुन रक्त येवु लागल्याने फिर्यादी तिथून पळण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीने त्याना आडविले. ‘ आज इसको जिंदा नही छोडुंगा ‘ असे म्हणत हातातील कोयत्याने फिर्यादी यांना जीवे ठार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डाव्या कानावर, डोक्यात कोयता मारला व हातानेही मारहान केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १८) रोजी रात्री ११.३० च्या दरम्यान शेतकरी कट्टा, पिंपरी भाजी मंडई, पिंपरी येथे घडली. फिर्यादी विशाल मनोज लोट (वय-२६ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. सेनेटरी चाळ, पिंपरी भाजी मंडई जवळ, पिंपरी) यांनी आरोपी सलमान शेख (वय अंदाजे ३० वर्षे, रा. भाजी मंडई, पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३१८ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०७,३२३, ५०४, आर्म अॅक्ट ४ (२७) महा. पो. अधि. नियमनुसार गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.