न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- अट्टल वाहनचोरांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली असून चोरीच्या ३,१०,००० रुपयांच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत.
पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात एक इसम दुचाकी चोरी करण्यासाठी येणार आहे. त्याच्याजवळ असलेली मोटार सायकल चोरीची आहे. तसेच त्याने पिंपरी चिंचवड परिसरात अनेक वाहन चोरीचे गुन्हे केलेले आहेत, अशी खात्रीशीर माहिती पोना कोकणे व पोना कदम यांना मिळाली. पोउपनिरी भांगे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना याबाबत माहिती दिली. वपोनि रामदास इंगवले यांनी दिलेल्या सुचनांवरुन दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी सापळा रचुन अतिशय शिताफाने आरोपींना पकडले. प्रतिक ऊर्फ हायजॅक योगिराज खडसे (वय २४ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, येरवडा मुळ रा. मंगळुरपिर जि. वाशिम) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीकडून तपसादरम्यान चोरीच्या दुचाकी जप्त करुन पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २९७/२०२३ भा.द.वि.क. ३७९, आळंदी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२४ / २०२० भा.द.वि.क. ३७९, लोणावळा पोलीस स्टेशन गु.र.नं. ६६ / २०२० भा.द.वि.क. ३७९, चाकण पोलीस स्टेशन गु.र.नं. / २०२० भा.द.वि.क. ३७९, चाकण पोलीस स्टेशन गु.र.नं. / २०२० भा.द.वि.क. ३७९ असे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
तसेच चिंचवडमध्ये पोउनि भांगे व स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना पोना बनकर व पोना कांबळे यांना मिळालेल्या बातमीवरुन आरोपी रमन मोहन ठाकुर (वय २२ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, चिंचवडगाव), शुभम गंगाराम पिटेकर (वय २४ वर्षे, रा. मंचर ता. खेड) जि. यांना अटक करुन त्यांच्याकडुन चोरीच्या २ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २५५/२०२० भा.द.वि.क. ३७९, मंचर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३८/२०२२ भा.द.वि.क. ३७९ हे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त गुन्हे सपना गोरे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देशमुख, पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, भरत गोसावी, सपोफौ महेश खांडे, पोहवा नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड, उमेश पुलगम, राहुल खारगे, आशिष बनकर, प्रविण कांबळे, सागर शेडगे, गणेश कोकणे, अमर कदम, समीर रासकर, प्रविण माने यांच्या पथकाने केली आहे.