न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२३) :- व्हॉट्सअॅपव्दारे ओळख करुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीने त्यांच्याशी मैत्री केली. नोकरीच्या कारणासाठी नोकरीनिमीत्ताने दिल्ली येथे जाण्यासाठी, त्याला झालेल्या कॅन्सरच्या उपचारासाठी, त्याच्या ओळखीचा एक इसम लोन करुन देत आहे त्याकरीता, कॅन्सरच्या उपचाराची औषधे घेण्यासाठी, प्रवास खर्चासाठी, तसेच त्याचा अपघात झाला आहे, त्याच्या उपचारासाठी अशी वेळोवेळी खोटी व वेगवेगळी कारणे सांगुन फिर्यादीला पैसे ट्रान्सफर करायला सांगितले.
प्रत्येक कारणावर विश्वास ठेवुन वेळोवेळी एकूण ३८,४८,६०९ रुपये आरोपीनी फिर्यादीकडून घेतले. ते पैसे परत न देता जर पैसे मागीतले तर घरातील सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली. घेतलेली रक्कम परत न करता आरोपीने फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार एप्रिल २०२० ते आजपर्यत पंचवटी सोसा., लेन नं. २. शरदनगर, चिखली येथे घडला.
४५ वर्षीय महीला फिर्यादीने आरोपी समीर शाहीर पटेल, मो.नं. ९७६४२७१५१ व ९१४५४२०१२३ धारक, गुगल पेनं. ९११२४५५५१११ व फोन पेनं ९१४५४२०१२३ धारक, तसेच ९८५०२३०६१६ व ९२७०४१४३१३ या फोन पे धारकव तसेच युपीआय आय डी nasirqureshio@ybl धारक, खातेक्रमांक ५०१००४४०३११७८२ खातेधारक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपींच्या विरोधात १८२/२०२३ भादवी कलम ४०६,४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















