न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२३) :- पोलीस हवालदार फिर्यादी आणि पोलीस शिपाई हे दोघे गस्त घालत होते. दरम्यान वाकड पोलीस स्टेशन (गुन्हा रजीस्टर नंबर ७९६/२०२२ भादवि कलम ५०६ (२), ३३७, ५०७) मधील परागंदा आरोपी हा त्यांना चौकामध्ये दिसला. फिर्यादीने आरोपीला पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून त्याला दाखल असलेल्या गुन्हयाच्या चौकशीसाठी पोलीस स्टेशन येथे सोबत चल असे सांगितले.
आरोपीने त्यास नकार दिला. पळून जावू लागल्याने फिर्यादी व पोलीस शिपाई यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांना आरोपीने हाताने मारहाण करुन फिर्यादीच्या दोन्ही हातांवर नखाने ओरखडले. तसेच फिर्यादी व पोलीस शिपाई या दोघांच्या उजव्या हाताला मनगटाजवळ जोरात चावा घेवून फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामामध्ये अडथळा आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २४) रोजी दुपारी १.१५ च्या सुमारास कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथे घडली. फिर्यादी पोलीस हवालदार यांनी आरोपी खंडु जालींदर लोंढे (वय २३ वर्षे, रा. रहाटणी) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात २७०/२०२३ भा.द.वि. कलम ३५३, ३३२ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
















