न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२३) :- ‘दुर्गमहर्षी’ प्रमोद मांडे यांनी स्थापन केलेल्या ‘गडकिल्ले सेवा संस्था, चिंचवड’ या गडकिल्ले संवर्धन आणि क्रांतीकारकांच्या विषयावर जनजागृती करणार्या संस्थेच्या माध्यमातून २३ मार्च ‘हुतात्मा दिनाचे’ औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दु.१०:०० ते २:३० च्या दरम्यान जवळपास ४५ रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
गेली २५ वर्षांपासून दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रभाव असलेली ‘गडकिल्ले सेवा संस्था २३ मार्च हा ‘हुतात्मा दिन’ म्हणून कृतज्ञता दिवस साजरा करीत आहे. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी जवळपास १५० ज्ञात आणि अज्ञात क्रांतीकारकांचा वास्तव इतिहास जगापुढे आणला.
संस्थेच्या माध्यमातून अविरत श्रमदान आणि उदयभाऊ गायकवाड युथ फांऊडेशन या संस्थांच्या सहकार्याने क्रांतीकारकांच्या विषयावर ‘आजादी के दिवाने’ हे दुर्गमहर्षींनी संकलित केलेले भव्य प्रदर्शन शुक्रवार दि.१७ ते शनिवार दि.१८ मार्च रोजी लावण्यात आले. या प्रदर्शनास शहरातील विविध माध्य.विद्यालय आणि शहरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.सुमारे १६०० विद्यार्थ्यांसह जवळपास ८०० नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन आपला अभिप्राय नोंदविला.
मोरया गोसावी क्रिडा संकुलातील संस्थेच्या पु.ल.देशपांडे ग्रंथालयाच्या आवारात चिंचवड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दु.१०:००ते २:३० या वेळेत हे शिबिर आयोजित केले गेले.
रक्तदान शिबिराचे उदघाटन नगरसेवक राजेंद्र गावडे व विरगळ अभ्यासक अनिल दुधाणे, रविराज फुगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश गावडे, कार्याध्यक्ष संतोष घुले, सचिव अॅड.अजय सोनवणे, खजिनदार प्रविण मळेकर, श्रीहरी तापकीर, मनोज काकडे, मनोज बालघरे, हनुमंत भोईर, जयंत पवार, संदिप संकपाळ, नितीन ठाकुर,उदयभाऊ गायकवाड, संदीप भालके, अविरत श्रमदानचे जितेंद्र माळी, मोहन कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वाय.सी.एम च्या रक्तपेढीमार्फत रक्त संकलन केले गेले. यावेळी पेढीचे डाॅक्टर्स आणि कर्मचार्यांनी सहकार्य केले.