न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू आहे. पदव्युत्तर पदवी आणि पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी परदेशातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेतून शिष्यवृत्ती मिळते. प्रती लाभार्थी विद्यार्थ्याला दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
पिंपरी चिंचवड शहरातून यावर्षी एकूण २८ अर्ज आले होते. त्यात आठ विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. त्यांना मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे.
मागासवर्गीय युवक युवतींना परदेशातील उच शिक्षणासाठी अर्थसाह्य दिले जाते. त्यातून ही निवड केली आहे, अशी माहिती समाज विकास विभागाचे सुहास बहाद्दरपुरे यांनी दिली