- आयआयबीएम संस्थेकडून पुरस्काराबद्दल प्रतीक्षा यांच कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२३) :- कराटे प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्व-संरक्षणाची सिद्धता तसेच वेगवेगळ्या शाळा, कॉलेजमधील विद्यार्थिनींच्या समस्या सोडविण्यास आपली प्रथम प्राथमिकता देणाऱ्या आयआयबीएम कॉलेजच्या प्रशासकीय प्रमुख प्रतिक्षा डफळ यांना मा. उपमहापौर शैलजाताई मोरे यांच्या हस्ते पोलीस नागरिक मित्र, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ आदर्श पोलीस नागरिक मित्र ‘ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ मुंडे, पोलीस नागरिक मित्रचे अध्यक्ष बाबुराव फडतरे, सचिव दिलीप गडदे, मा. उपमहापौर शैलजाताई मोरे, मा. नगरसेविका शर्मिला बाबर, मा. नगरसेविका अनुराधा गोरखे, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया कोलते, मा. नगरसेवक सचिन चिखले, आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत, शहाबाज काजी, सिद्धार्थ गायकवाड आदी उपस्थित होते.
निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ मुंडे म्हणाले, शहर गुन्हेगारीमुक्त बनविण्यासाठी प्रत्येकाने पोलीसांच्या कार्याला हातभार लावला पाहिजे. आजच्या तरुण पिढीने, युवक, युवतींनी पोलीसांचा सच्चा मित्र बनून कायद्याच्या चौकटीत राहून कुप्रवृत्तीविरुद्ध लढा दिला पाहिजे.
आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत यांनी कॉलेजच्या प्रशासकीय प्रमुख प्रतिक्षा डफळ यांचे पुरस्काराबद्दल कौतुक केले. त्यांनी अत्यंत कमी वयात स्वतःला सिद्ध करून आई-वडिलांची मान उंचावली आहे. प्रत्येक मुलीसमोर आज प्रतिक्षा डफळ या एक उत्तम उदाहरण आहेत, असे मत व्यक्त करीत पोलीस नागरिक मित्र संस्थेला शुभेच्छा दिल्या.
प्रतिक्षा डफळ यांना मिळालेल्या सत्काराबद्दल आयआयबीएम संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, विभाग प्रमुख अनिकेत वंजारी, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकांनी शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले.















