न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पेठ क्रमांक ३० वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे व्यापारी गाळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ३१ दुकानांपैकी ११ दुकानांकरीता (दि. ५/१/२०२३) रोजी ई-लिलाव प्रक्रीया पार पडली. या गाळ्यांना व्यापारी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे वाल्हेकरवाडीमध्ये पीएमआरडीएचे सर्व सोयीसुविधांयुक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स आकारले आहे.
उर्वरीत २० वाणिज्य दुकानं ८० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यासाठी ई-लिलाव प्रक्रीया राबविण्यात आली आहे. इच्छुक लिलावधारकांना संकेतस्थळावरुन २४ एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. (दि. ११/०५/२०२३) ई-लिलावाद्वारे भाडेपट्ट्याने या दुकानांचे वाटप करण्यात येणार आहे.
लिलाव प्रक्रीयेची संपूर्ण माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (https://pmrda.gov.in) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण लिलाव प्रक्रीया https://eauction.gov.in या संकेतस्थळावरुन होईल, अशी माहिती प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली आहे.