न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२३) :- रामनवमी निमित्त किर्तन ऐकण्यासाठी महिला फिर्यादी गेल्या होत्या. किर्तन संपल्यानंतर रामजन्मोत्सवसाठी ठेवण्यात आलेल्या पाळण्याचे दर्शन घेत असताना गर्दीचा फायदा घेत फिर्यादीची नजर चुकवुन ५०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे मिनीगंठण मंगळसूत्र अज्ञात चोरटयाने चोरुन नेले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ३०) दुपारी १२.३० च्या सुमारास हनुमान मंदिर, कृष्णानगर, चिंचवड येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी आरोपी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २२९/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.