न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२३) :- मावळ तालुक्यातील डोणे येथील गट नं. १५८ मधील २२००० स्वेअर फुट जागा विकत देण्याचे ठरवले. आरोपीने रजिस्टर, साठेखत करुन जागेसाठी फिर्यादीकडुन एकुण १९,६५,००० रूपये घेतले. दरम्यान पैसे घेऊनही जागा न देता फिर्यादीची फसवणुक केली आहे.
हा प्रकार नोव्हेंबर २०१९ ते ३०/०३/२०२३ पर्यंत गुडवीन सिटी, विजय सेंटर, निअर युको बँक, खराळवाडी, पिंपरी येथे घडला. फिर्यादी वैभव दिलीप चव्हाण (वय २९ वर्ष, धंदा-व्यवसाय, रा. फ्लॅट नं. ८०, ए विंग, सरिता अपार्टमेंट, कासारवाडी) यांनी आरोपी पुर्णचंद्र सनातन स्वाईन, महिला आरोपी, प्रिन्स पुर्णचंद्र स्वाईन (रा.गुडवीन सिटी, खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ३७९/२०२३ भादंवि कलम ४०६, ४२०, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.