न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२३) :- महापालिकेच्या वतीने वडमुखवाडी, च-होली येथे संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. हा तलाव नागरिकांसाठी येत्या शनिवारी (दि. १) खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिक, खेळाडू व महिलांना पोहण्याची सोय होणार आहे.
तलावाचे काम अनेक वर्षांपासून सुरू होते. अखेर, ते पूर्ण झाले आहे. उन्हाळा असल्याने नागरिकांची मागणी वाढल्याने पालिकेच्या क्रीडा विभागाने तलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पोहण्यासाठी आठ बॅच आहेत.
सकाळच्या सत्रात ६ ते ६.४५, ते ७.४५, ८ ते ८.४५ आणि ९ ते ९.४५ अशी बॅच आहे. दुपारच्या सत्रात २.३० ते ३.१५, ३.३० ते ४.१५, ४.३० ते ५.१५, सायंकाळी ५.३० ते ६.१५ या वेळेत बॅच आहेत. सकाळी ९ ते ९.४५ आणि दुपारी २.३० ते ३.१५ या दोन बॅच महिलांसाठी राखीव आहेत.
पालिकेच्या pcmcindia. gov. in या संकेतस्थळावर आगाऊ तिकीट बुकींग करून पोहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी केले आहे.