न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२३) :- विनायक गायकवाड युथ फाऊंडेशन आयोजित वाकड प्रीमियर लीगच्या ६ व्या पर्वाचा चषक वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या वाकड प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वामध्ये २५० संघांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. यावर्षी महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर लाभला.
अत्यंत चुरशीचे सामने, जय-पराजयाची चिंता न करिता खेळाडू वृत्तीने खेळणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे, महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची अद्वितीय खेळाडू वृत्ती आन सर्वात महत्वाचे म्हणजे वाकड प्रीमियर लीग हा मर्यादित कार्यक्रम अथवा संकल्पना नसून एक पारिवारिक भावना आहे हे यावर्षीचे प्रमुख वैशिष्ठ्य.
या वर्षीच्या महिला संघामध्ये पहिला क्रमांक वेदांता जेम्स, दुसरा क्रमांक रिदम फ्लायिंग स्क्वेरल व तिसरा क्रमांक डायनॅस्टी डेअर ड्रीमर्स यांनी पटकाविला.
ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये पहिला क्रमांक ७ पी डी, दुसरा क्रमांक दत्तकृपा संघ व तिसरा क्रमांक वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघ यांनी पटकाविला. पुरुषांच्या संघामध्ये पहिला वीर मराठी, दुसरा क्रमांक साठेनगर योद्धा व तिसरा क्रमांक आर एस एच वॉरियर्स यांनी पटकाविला.
यावेळी मा. नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते विजयी संघाना चषक वितरण करण्यात आले. वाकड परिसरातील सोसायटी सभासद मोठ्या संख्येने सामने पाहायला व चषक वितरण सोहळ्याकरीता उपस्थित होते. सदस्यांनी आपले अनुभव यावेळी उपस्थित केले.












