- मावळते अध्यक्ष अनिल फरांदे पायउतार; रणजित नाईकनवरे संघटनेचे नवे अध्यक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२३) :- क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक रणजित नाईकनवरे यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष अनिल फरांदे यांच्याकडून रणजित नाईकनवरे यांनी शनिवारी (दि. १) रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
व्यवस्थापकीय समितीच्या झालेल्या बैठकीत नाईकनवरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोच्या उपाध्यक्षपदी अमर मांजरेकर, मनीष जैन, आदित्य जावडेकर, राजेश चौधरी, विनोद चांदवानी, अरविंद जैन यांची तर अश्विन त्रिमल, तेजराज पाटील, कपिल गांधी, अरविंद जैन, मनीष जैन अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
आय. पी. इनामदार हे संघटनेचे नवीन कोषाध्यक्ष असतील. कपिल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा जनसंपर्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबरोबरच संघटनेच्या वतीने अखिल अगरवाल हे रेरासंदर्भातील विषय तर मनीष कनेरिया हे पर्यावरणाशी निगडित विषय हाताळतील. व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यपदी संजय देशपांडे, अखिल अगरवाल, मनीष कनेरिया, संतोष कर्णावट, सतीश अगरवाल, सपना राठी, केतन रुईकर, दिलीप मित्तल, अनुप झमतानी, सिद्धार्थ मूर्ती, पुनीत ओसवाल, अभिषेक भटेवरा, वसंत काटे, ईशान मगर, कपिल त्रिमल यांची निवड करण्यात आली आहे.












