न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२३) :- लग्नास होकार देत नाही, म्हणुन फिर्यादी महिलेला त्या राहत असलेल्या ठिकाणाहून जबरदस्तीने आरोपी राहत असलेल्या घरी नेले. तिथे फिर्यादीवर वेळोवळी जबरदस्ती केली. त्यांना आरोपीने मारहाण व शिवीगाळ करीत गळ्याला चाकु लावुन फिर्यादीच्या घरच्यांकडे पैशाची मागणी केली. पैसे नाही दिले तर जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीला आरोपी राहत असलेल्या घरात डांबुन ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार २२ ऑक्टोबर २०२२ ते आजपर्यंत एसव्ही पीजी, लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी तेजस किरण सौदाणकर (वय २४ वर्षे, रा. बी ३०६, मंत्राईसेन्स सोसायटी, उंड्री पिसोळी लिंक रोड, पिसोळी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ४३२/२०२३ भा.दं.वि. कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (एन) ३२४,३४४,३२५, ५०४, ५०६ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.












