न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२३) :- सामान व कपडे आणण्यासाठी फिर्यादी यांची मुलगी ही तिच्या लहान मुलीसह दुकानात गेली होती. दरम्यान आता थोडेच सामान घेऊन जाणार आहे, बाकीचे नंतर घेऊन जाते, असे म्हणाल्याने आरोपीला त्याचा राग आला. त्याने चिडुन जाऊन फिर्यादीची मुलगी हिला केसांना धरुन हाताने मारहान केली. तसेच तीच्या लहान मुलीलादेखील हाताने मारहान करुन दोघींनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी हे त्यांची भांडणे सोडविण्यासाठी गेलो असता आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन फिर्यादीच्या उजव्या हाताला दोन ठिकाणी चावा घेऊन फिर्यादीला जखमी केले.
ही घटना (दि. ३१/०३/२०२३) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास वेस्टर्न एव्ह्यून्यु सोसायटी, के बिल्डींग, फ्लॅट नं. १३०४, सयाजी हॉटेलच्या बाजुला, वाकड येथे घडला.
फिर्यादी अजय बाबुलाल शहा (वय ६६ वर्षे, धंदा- व्यापार, रा. ९६/१, महावीर नगर, दुसरी गल्ली, सांगली) यांनी आरोपी गौरव अजित शहा (वय ३५ वर्षे रा. वेस्टर्न एव्ह्यून्यु, के बिल्डींग, फ्लॅट नं. १३०४, सयाजी हॉटेलच्या बाजुला, वाकड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ३२६/२०२२ भा.दं.वि. सहिता कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.












