न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२३) :- वाकड येथील कस्पटे चौकातील रस्त्यावरून फिर्यादी हे (एमएच१४ईएस७२०३) या दुचाकीवरून जात होते. दरम्यान उजवीकडे वळत असताना त्यांच्या उजव्या बाजुने बीआरटी मार्गातून जोरात आलेली पीएमपीएमएल बस (एमएच१२टीव्ही०३३०) यावरील चालकाने त्याची बस वाहतूकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून दुचाकीच्या हॅण्डलला बसच्या डाव्या बाजुने धडक दिली. त्यामुळे फिर्यादी हे गाडीसह रस्त्यावर पडले. अपघातात फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपरास जखम होवुन मार लागला. याप्रकरणी बसचालक कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २) रोजी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी अनिल बाबुराव बिडवे (वय ३२ वर्षे, धंदा-इलेक्ट्रीशन, रा. गंगापार्क, ए विंग, फ्लॅट नं. ०३, काटे पेट्रोलपंपाजवळ, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी पीएमपीएमएल बस (एमएच१२टीव्ही०३३०) यावरील चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात ३३०/२०२३ भा.दं.वि. कलम २७९, ३३७ मो.वा.का. कलम १८४,११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












