न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२३) :- दुकानातील महिलांच्या कपडयाचे १० नग असलेला गठ्ठा अनोळखी ४ बुरखाधारी महिलांनी चोरून नेला आहे. त्याची किंमत ५४०० रुपये एवढी आहे.
ही घटना (दि. २) रोजी दुपारी १.०० वाजता बी ब्लॉक, १८/८ व ९, मेन बाजार, पिंपरी येथे घडली.
फिर्यादी मोहनदास सिरुमल तेजवानी (वय ६२ वर्षे, धंदा- कपड्यांचा व्यापार, रा. फ्लॅट नं. ए- ६०१, सोसा., निरंकारी सत्संग भवन जवळ, विजयनगर, काळेवाडी साई एम्राल्ड) यांनी आरोपी अनोळखी ४ बुरखाधारी महिलांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी अज्ञात महिलांच्या विरोधात ३९०/२०२३ भा. दं. वि. संहिता कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.












