- कारवाई टाळण्याच्या हेतुने कार चालकाचा प्रताप; चिंचवड वाहतुक विभागासमोरील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२३) :- सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादी वाहतुक नियमन करीत होते. त्या दरम्यान मारुती सुझुकी कंपनीची काळी काच असलेली स्विफ्ट गाडी (एमएच०२बीवाय१६४४) तिथे आली. कारवाई टाळण्याच्या हेतुन गाडीवरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात कार चालवुन फिर्यादीला बोनेटवर चालवत घेवुन जावुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीच्या जवळील शासकीय इ-चलन मशीनच्या नुकसानीस कारणीभूत ठरला. कार वेडीवाकडी चालवुन आरोपी चालक पळुन गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ४) रोजी दुपारी ४.३५ वाजेच्या सुमारास खंडोबा माळ चौक, चिंचवड येथुन चिंचवड वाहतुक विभागासमोर जाणा-या सार्वजनिक रोडवरील वाहतुक विभागासमोर घडली.
फिर्यादी किरण माणिकराव घोडके (वय ३० वर्षे, पोशि. २६३४, चिंचवड वाहतुक विभाग) यांनी आरोपी मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट काळी काच असलेली कार क्रमांक (एमएच०२बीवाय१६४४) वरील अज्ञात चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात १५२ / २०२३ भादविक ३०७, ३५३, २७९, सह मो. वा. का.क. १८४, १००,५१/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.












