न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळ कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार प्रवासी जागीच ठार झाले. यावरून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो.
मुंबईवरून येणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. अतिवेगात आलेल्या कारने मालवाहू ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे कारचा दर्शनी भाग ट्रकच्या मागील बाजूस पूर्ण घुसल्याने कारमधील चार प्रवासी जागीच ठार झाले, तर कारचा चक्काचूर झाला आहे.
ही घटना उर्से टोल नाक्याजवळील ८२ किलो मीटरवर पडली. अपघातानंतर घटनास्थळी शिरगाव-परंदवडी पोलीस, देवदूत रेस्कु टीम आणि आयआरबी कर्मचारी दाखल झाले होते. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली.
















