न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२३) :- नाणेकरवाडी येथील नटराज वजन काटा परिसरातील प्लॉटमध्ये (दि. ६) रोजी रात्री ९.३० च्या सुमारास पाच गुंठ्यांच्या लोखंडी शेड बनविण्याच्या कामाच्या ठिकाणावरून २५० किलो लोखंडी सामानाची चोरी केली. चोरीचा माल बजाज पल्सर (एमएच१४जेएफ३०८२) वरुन घेवून जात असताना आरोपी निदर्शनास आले.
फिर्यादी वसिम अहमद ओबैदुलाह खान (वय ३३ वर्षे, व्यवसाय व्यवसाय, रा. अक्सा ॲम्पायलर बी विंग, फलॅट नं. ६०८ मोशी आळंदी रोड, मोशी) यांनी
आरोपी किरण राजेन्द्र वाघ (वय २७ वर्षे रा. कैलास सोनवणे यांचे खोलीत भाडयाने, कुरुळी ता.खेड जि.पुणे), रवानी शेख (पुर्ण नाव माहीत नाही, वय ३० वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी दोघांच्या विरोधात ३५८/२०२३ भादवि का क ३७९,५११, ३४ नुसार गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.