न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२३) :- ‘ये साल्या थांब आम्हाला कट मारतो काय’ असे मोठयाने आरोपी फिर्यादीला ओरडला. अॅक्टीव्हावरून शिमलाईन हॉटेलकडून घरी येत असताना फिर्यादीचा तोंड ओळखीचा आरोपी १ व त्याचे दोन मित्र आरोपी २ व ३ हे पांढ-या रंगाच्या अॅक्टीव्हावर बसून रस्त्यात गप्पा मारत होते. फिर्यादी हे त्यांच्याजवळून पुढे गेले. तेव्हा आरोपी १ याने फिर्यादीला वाईट शिवीगाळ केली. फिर्यादी घाबरून घरी जात असताना आरोपी १ ते ३ हे पांढऱ्या रंगाच्या अॅक्टव्हावर येवून संगणमताने ‘ आम्हाला कट मारतो काय’ असे म्हणत फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण करून, लाकडी फळी डोक्यात मारून, दगडाने पायावर, पाठीवर, डाव्या हाताच्या कोप-यावर मारून फिर्यादीला जखमी केले.
‘ तु आम्हाला कट कसा मारला, चल तुला आमच्या भाईकडे घेवून जातो’ असे म्हणून जबरदस्तीने त्यांच्या पांढ-या रंगाच्या अॅक्टीव्हावर फिर्यादीला बसविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी बसले नाहीत म्हणून फिर्यादीस फरफटत बिल्डीगच्या गेटपर्यंत नेवून डाव्या हाताचे कोप-यावर व डाव्या कमरेच्या खाली खरचटून जखमी केले. त्यांच्या तोंडात घाण वाळूचे कण टाकून ‘ तु पोलीसांकडे गेला तर तुला खल्लास करून टाकीन’ अशी धमकी देवून अॅक्टीव्हावर बसून पळून गेले. या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील १,५०० रुपयांची दिड तोळ्याची चांदीची चैन पडून गहाळ झाली, असे फिर्यादी म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ७) रोजी रात्री २.१५ च्या सुमारास झुलेलाल कॉम्प्लेक्स, सुरेश प्लायऊड दुकानाच्या पाठीमागे, भाटनगर, पिंपरी येथील बिल्डींगच्या पार्किंगमध्ये घडला.
फिर्यादी करण मदन शिरसाठ (वय २३ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. रूम नं. १०, दुसरा मजला, बिल्डींग नं. बी, झुलेलाल कॉम्प्लॅक्स, सुरेश प्लायऊड दुकानाच्या पाठीमागे, भाटनगर, पिंपरी) यांनी आरोपी अमिन शेख (रा. गॅलाड चौकाजवळ, शास्त्रीनगर, पिंपरी), आकाश कांबळे (रा. पत्राशेड, लिंकरोड चिंचवड), आकाश मोरे (रा. पत्राशेड, लिंकरोड चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ४०४ / २०२३ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ३५२, ४२७, ५०४, ५०६, ३४, महा. पो. अॅक्ट ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.