न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२३) :- महिंद्रा शोरूमच्या पार्किंगमध्ये फिर्यादी काम करत होते. आरोपी १ हा तिथे पुर्वी सिक्युरिटीचे काम करत होता. तो नेहमी उशिर येत असल्याने त्यास कामावरुन काढण्यात आले होते. त्याबाबत चिडुन जावुन फिर्यादी यांना पगाराबाबत त्याने विचारले. फिर्यादी यांनी त्याला ऑफ़िसकडे संपर्क कर, असे सांगितले. त्यावरून चिडुन जावुन फिर्यादी यांना आरोपीच्या सोबत असणारे त्याचे मित्र आरोपी ३ व ४ व इतर अनोळखी इसमांनी दगड डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच आरोपी २ ते ४ यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. फिर्यादी यांना मारहाण होत असताना तेथिल सिक्युरिटी गार्ड हा त्यांना वाचविण्याकरिता आला असता त्यालासुध्दा दगडाने व लाकडी बांबुने मारहाण करुन शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ६) रोजी रात्री १०.०० च्या सुमारास महिंद्रा शोरूमच्या पार्कीगमध्ये, सुस ब्रिजजवळ, सुस, ता. मुळशी जि. पुणे येथे घडली.
फिर्यादी शिवम संतोष सोनी (वय २३ वर्षे, धंदा. नोकरी, रा. पिताश्री बिल्डींग समोर, आनंत हॉस्पीटल जवळ, वारजे माळवाडी) यांनी आरोपी १) करण विजय जोशी (वय १९ वर्ष रा. सुतारवाडी), २) करण विजय जोशी, ३) आदित्य पाईके ४) वैभव कोढार व एक अनोळखी इसम (रा. माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ४६७/२३ भा.दं.वि. कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४,३४ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.