- आपला महासंघ अनं नवोदित शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच पराभूत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची झाली. स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघाने निवडणुकीत बाजी मारली आहे. या निवडणुकीसाठी तब्बल 87. 67 टक्के मतदान झाले. संपूर्ण मतमोजणीमध्ये सुमारे 250 ते 300 मते बाद ठरली.
मतमोजणी रात्री ८.30 च्या दरम्यान सुरु झाली होती. पहाटे २.40 वाजता मतमोजणी संपली. निवडणूक निर्णय अधिकारी पंकज राऊत यांनी निकाल 02.45 वाजता निकाल जाहीर केला.
महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत तीन पॅनलसह तीन अपक्ष रिंगणात होते. यामध्ये स्व. शंकरअण्णा गावडे कर्मचारी महासंघ, आपला महासंघ आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच या पॅनलचा समावेश आहे. प्रचारात तीन पॅनलच्या उमेदवारांनी जोरदार आरोप-प्रत्यारोप करून धुरळा उडून दिला होता. महापालिका सेवक पतसंस्थेच्या १९ जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात होते. त्यात 14 जागा सर्वसाधारण, दोन जागा महिलांसाठी आणि अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी प्रत्येकी एक जागा राखीव होती. त्यासाठी अनुक्रमे 38, पाच, चार, तीन आणि चार उमेदवार रिंगणात होते.
सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत महापालिका भवन परिसरातील पार्किंगमध्ये शांतेत मतदान पार पडले. महापालिका परिसरात एखाद्या विधानसभा निवडणुकीचे मतदान असल्याचे चित्र दिसत होते. जागो-जोगी उमेदवार आणि त्यांचे समर्थक कर्मचारी गळ्यात गमजे घालून मताचा जोगवा मागत होते. दिवसभर पालिकेत आणि परिसरात गजबज दिसून आली. या निवडणुकीत 3 हजार 739 कर्मचाऱ्यांपैकी 3 हजार 67 मतदारांनी मतदानाचा म्हणजे 87. 67 टक्के मतदान झाले.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :-
स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ (विजयी पॅनेल) :- विशाल भुजबळ – 1659, सनी कदम – 1647, शिवाजी येळवंडे 1630, नथा मातेरे 1694, वैभव देवकर 1612, भास्कर फडतरे 1610, विजय नलावडे 1641, गणेश गवळी 1573, कृष्णा पारगे 1577, विश्वनाथ लांडगे 1561, संदीप कापसे 1627, अभिषेक फुगे 1695, योगेश रानवडे 1585, चंद्रकांत भोईर 1608, कांबळे विजया 1673, चारुशीला जोशी 1689, लखन अनिल 1517, विजय मुंडे 1589, ज्ञानेश्वर शिंदे 1618.
प्रतिस्पर्धी (पराभूत पॅनेल) आपला महासंघ :- बाळासाहेब कापसे 1194, तुषार काळभोर 1100, मंगेश कोंढाळकर 1179, संदीप गव्हाणे 1220, गणेश घाडगे 1086, निलेश घुले 1122, अंबर चिंचवडे 1338, राजाराम चिंचवडे 1123, नितीन ठाकर 1035, अविनाश तिकोणे 1137, धनाजी नखाते 1174, रवींद्र लांडगे 1135, योगेश वंजारे 1112, नानासाहेब सोनवणे 1003, सुवर्ण घोसाळकर 1046, पल्लवी बोऱ्हाडे 1125, गणेश भोसले 1108, दिनेश कुदळे 1279, रंजीत भोसले 1198.
शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच (पराभूत पॅनेल) :- ज्ञानेश्वर इंगवले – 147, परशुराम कदम 158, शंतनु कांबळे 140, बाळासाहेब कापसे 170, मनिष कुदळे 155, संतोष कुदळे 173, संजय जगदाळे 235, दत्तात्रय दुधे 143, इस्माईल शेख – 184, माया वाकडे 250, प्रवीण उघडे 138, हेमंत जाधव 219, महेश कोळी 117.
गगनगिरी पॅनेल (पराभूत पॅनेल) :- अजय भोसले 230, अभिमान भोसले 304, विनोद कुसळकर 179.