न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- दारु पिण्यासाठी फिर्यादीने दोघांना पैसे दिले नाहीत, त्यावरून दोघांनी फिर्यादीला मारहाण केली. फिर्यादी यांनी दोघांविरुध्द दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा मनात राग धरुन आरोपी १ व २ यांनी हाताने व लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या डोळयावर, नाकावर, चेह-यावर व डोक्याच्या डाव्या बाजुला व कानाच्या वर मारहाण व शिवीगाळ करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीसोबत असलेले दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटात, पाठीवर मारहाण केली. फिर्यादी बेशुध्द अवस्थेत रस्त्यावर पडलेले असताना रस्त्यावर स्कॉरपिओ गाडीच्या खाली फेकुन आरोपी तीथुन निघुन गेले, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि ११) रोजी रात्री ००.३० च्या सुमारास साईधाम मुलींच्या हॉस्टेल शेजारी, देहुफाटा येथे घडली. फिर्यादी मयुर विनायक उकले (वय २२ वर्षे, धंदा शिक्षण, रा. देहुफाटा; मुळगाव शिरुर जि. पुणे) यांनी आरोपी १ लखन शिंदे (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही), २ राकेश विजय सोळंकी (वय १८ वर्षे, पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही), ३. दोन अनोळखी इसम (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी आरोपींवर १६६/२०२३ भा.द.वि. कलम ३०७,३२३, ५०४, ५०६ (२),४२७,३४ नुसार गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे.