- वडमुखवाडीत विवाहितेची गाडी अडवून विनयभंग; पतीलाही धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- मुलांना शाळेत सोडुन व्हेस्पा गाडीवरुन फिर्यादी महिला घरी जात होती. त्यावेळी आरोपींनी महिलेची गाडी रस्त्यात अडवली. फिर्यादीचा हात धरला व काल झालेल्या वादाच्या कारणावरुन वाईट शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली.
” आम्ही गाववाले असुन, आमचे कोणी वाकडे करु शकत नाही ” असे म्हणत महिलेच्या डाव्या बाजुला, खांदयाला धरल्याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. तसेच महिलेने त्यांच्या विरुध्द तक्रार देवु नये, म्हणुन त्यांचे पती व दिर यांनादेखील आरोपींनी धमकी दिली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि ११/०३/२०२३) रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास वडमुखवाडी, च-होली येथील रस्त्यावर घडली. महिला फिर्यादीने आरोपी सचिन तापकीर (वय अंदाजे ३८, रा. तापकीर वस्ती, च-होली) व त्याचे वडील व भाऊ (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी तिघांच्या विरोधात १६५/२०२३ भादवी कलम ३४१, ३५४ ब, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे.