न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- बांधकाम साईडवरील ९७,७५० रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरी करुन नेले आहे. चोरीची घटना (दि १/०३/२०२३) रोजी रात्री ९.०० ते दि. ०२/०३/२०२३) रोजी सकाळी ९.०० च्या दरम्यान पुनावळे-रावेत येथील काटे वस्तीत घडली.
फिर्यादी संदीप मुरलीधर पाटील (वय ३० वर्ष, धंदा ठेकेदार, रा. पुणे) यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी १६७ / २०२३ भा.दं.वि कलम ३७९ नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.