न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- ऑडी कार चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन, भरधाव वेगाने ऑडी (एमएच१४सीएम९५९५) हि गाडी चालवली. फिर्यादीच्या ७ वर्षाच्या मुलाला धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी करुन फिर्यादीच्या मुलाच्या मरणास कारणीभुत झाला. हा अपघात (दि ११) रोजी दुपारी ४.४० वाजेच्या दरम्यान रसरंग चौक, चव्हाण हॉस्पीटल समोर, नेहरुनगर, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी रावसाहेब आण्णा काकडे (वय ४१ वर्षे, धंदा मजुरी, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी आरोपी ऑडी कार नं. एम. एच. १४ सी.एम. ९५९५ वरील अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात ४२० / २०२३ भा.द.विकलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८ मो. व्हॅ. अॅक्ट कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.