न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २० मार्च) :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल यमुनानगरच्या विद्यार्थ्यांचे भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केले. विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी या विषयाबरोबरच समाजशास्त्र या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी राज्यस्तरावर भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते.
या परीक्षेत विद्यालयातून १३३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यात प्रथम सूर्यवंशी गौरी भारत (गोल्ड मेडल) द्वितीय कुलकर्णी भैरवी भिकू (सिल्वर मेडल), तृतीय जाधव अनिषा मंगेश (ब्राँझ मेडल) प्राप्त केले. या परीक्षेत विद्यार्थी सहभाग वाढवल्याबद्दल शिक्षिका मनीषा महादेव बोत्रे यांना उपक्रमशील ‘भूगोल शिक्षक’ हा पुरस्कार मिळाला.
यशस्वी कृषी विद्यार्थ्यांचा गौरव करताना प्राचार्य डॉ. सतीश गवळी म्हणाले की, या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धा परीक्षेला बसले पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, भूगोल विभाग प्रमुख खंडू खेडकर, संस्था सदस्य राजीव कुटे यांनी सहकार्य केले. शाळा समिती अध्यक्ष शरद इनामदार, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहसचिव ज्योत्स्ना एकबोटे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.















