न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- मोबाईल दिला नाही म्हणून फिर्यादीच्या १९ वर्षीय मुलाच्या दोघा मित्रांनी चिडुन जावुन त्याच्या डाव्या बाजुला, कानाला, डोक्याला लोखंडी कु-हाड मारली. दुसऱ्याने डोक्याच्या पाठीमागील बाजुस लोखंडी कोयता मारुन जखम केली. गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १६) रोजी रात्री ०२.३० च्या सुमारास पी.एम.टी.चौक, भोसरी, मच्छी मार्केट फुटपाथवर, भोसरी, पुणे नाशिक पुणे हायवे रोड जवळ घडला. महिला फिर्यादीने आरोपी २ विधीसंघर्षित बालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी दोघांच्या विरोधात ३५४/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७,३४, आर्म ऑक्ट ४ (२५)मपोका क ३४ (१) १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















