न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- पुनावळेतील चितळे मिठाईवाले, न्यु पुना बेकरी आणि श्रीपाद हार्डवेअर या दुकानांचे लोखंडी शटर अज्ञात चोरटयाने उचकटुन आत प्रवेश केला. दुकानांच्या गल्ल्याचा ड्राव्हर कशाने तरी उचकटुन फिर्यादी यांच्या श्रीपाद हार्डवेअर या दुकानातुन २५,७८० रोख रक्कम तसेच ५००० रूपये किंमतीचे १०० ग्रॅम वजनाची चांदीची नाणी पुना बेकरी दुकानाच्या गल्यातील आणि ३०,००० रुपये रोख रक्कम हे चितळे मिठाईवाले या दुकानातुन तसेच आदीत्य हार्डवेअर दुकानाच्या गल्यातील ८,००० रुपये रोख रक्कम असे एकुण ६८,७८० रुपये किंमतीचा माल घरफोडी करुन चोरुन नेला आहे.
ही घटना (दि. १५) रोजी ९.३० ते (दि. १६) रोजी ७.०० च्या दरम्यान पुनावळे गावातील सिध्दसिला ईला सोसायटी आणि सुखदा अपार्टमेंट मध्ये घडली.
फिर्यादी वैभव विदयाधर अफजलपुरकर (वय ३३ वर्षे, धंदा व्यापार, रा. गल्ली नं. ३, घर नं. ३, प्रभात कॉलणी, केशवनगर, चिंचवड) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १८२/२०२३ भा.द.वि.सं.कलम ३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















