न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाचालकाने त्याची रिक्षा भरधाव वेगाने चालवुन समोरील दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात फिर्यादीचे ६८ वर्षीय वडील गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात रिक्षा चालक अपघातस्थळी न थांबता पुढे निघून गेला. तसेच फिर्यादीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा अपघात (दि. १५) रोजी ११.४५ वाजेच्या सुमारास डी मार्ट, चिंचवड समोर, पुणे मुंबई सार्वजनिक रोडवर घडला.
फिर्यादी अभिषेक प्रदिप कदम (रा. पिंपरी) यांनी आरोपी अज्ञात रिक्षा चालक (नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ४३६/२०२३ भा.द.विकलम ३०४(अ) २७९,४२७ मो. के. अॅक्ट कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















