न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- चुलत भाऊ हा फिर्यादीच्या मालकीच्या घरात भाड्याने राहण्यास आहे. डिसेंबर २०२२ पासुन आरोपीने फिर्यादीचे घरभाडे देण्यास टाळाटाळ केली. त्यांचे एकमेकांशी पटत नाही. दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या इच्छेविरुध्द फिर्यादीच्या घरात घुसुन “पैसे नही दुंगा, जो करना है करलो, मैं क्या कर सकता है तुमको दिखाता हु” असे म्हणत फिर्यादीला धमकावून हाताने मारहाण केली व फिर्यादीच्या बहिण व मुलीला शिवीगाळी केली.
ही घटना (दि. १४) रोजी सायं ५.०० वाजेच्या सुमारास मिलींदनगर, पिंपरी येथे घडली. महीला फिर्यादीने आरोपी कैलास विरुमल लाडी (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. मिलींदनगर, पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ४३८/२०२३ भा. दं. वि. संहिता कलम ३२३, ४५२, ५०६, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















